Tuesday, August 10, 2021

पालक म्हणून, तुमच्या मुलासाठी सर्वात उत्तम !

"शिक्षण हे जग उघडण्याची गुरुकिल्ली आहे, स्वातंत्र्याचा पासपोर्ट" - ओपरा विनफ्रे

 

पालक म्हणून, तुमच्या मुलासाठी सर्वात उत्तम - उत्तम शालेय शिक्षण, आयुष्यातील सर्वोत्तम संधी इत्यादी हव्या आहेत हे स्वाभाविक आहे.

 

शिक्षण हे सर्वकाही आहे हे आपल्यामध्ये दृढपणे अंतर्भूत आहे आणि मुलांनी त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रासाठी उच्च शाळांमध्ये जावे अशी आमची इच्छा आहे.

 

जरी पालकांसाठी शिक्षण हे सर्वात महत्वाचे प्राधान्य असले तरी खर्च ही एक मोठी चिंता आहे. ते उत्तम शिक्षण देण्यासाठी त्यांच्या बचतीचा मोठा भाग खर्च करतात.

 

विशेषतः जर तुम्हाला तुमच्या मुलाने चांगल्या संस्थांमध्ये आणि परदेशात जावे असे वाटत असेल. आपण लवकरच नियोजन सुरू केले पाहिजे कारण केवळ शिक्षण खर्च वाढत आहे

 

म्हणूनच, हे ध्येय साध्य करण्यासाठी आर्थिक योजना अत्यंत महत्वाची आहे, तुम्ही जितक्या लवकर नियोजन सुरू कराल तितके चांगले.

 

तेही भारताच्या सर्वात विश्वासू ब्रँड सोबत


अधिक माहिती साठी संपर्क करा,

8888 344 306 | satpute.co.in | sbs@satpute.co.in

 

अथवा खालील लिंक वर क्लिक करा 

https://cutt.ly/Ov7j48S

 

Friday, March 19, 2021

एसबीआय रीटायर स्मार्ट पेंशन योजना # रीटायरमेन्टला निश्चित रक्कम पेंशन स्वरूपात मिळण्यासाठी.....

 रीटायर स्मार्ट पेंशन योजना  # रीटायरमेन्टला निश्चित रक्कम पेंशन स्वरूपात मिळण्यासाठी.....

योजनेचे महत्त्व #

1.आधुनिक युगातील 21व्याशतकात सरासरी आयुष्यमान वाढणे सुरूच आहे सध्या  80/85 वर्षापर्यंत जगणे सोपे झाले आहे.

आपली शरीरिक आणि मानसिक प्रकृतीसुद्धा ठराविक वयापर्यंत साथ देते , परंतु आयुष्यातील जगण्याच्या शेवटच्या महिन्या पर्यंत पेंशन प्लॅन पैशांची तरतूद करतो .
 
2. आपण कायमचे कार्य करू शकत नाही, विशिष्ट कालावधीनंतर उत्पन्न थांबेल, परंतु खर्च नाही .
जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत पैशाची आवश्यकता असते ,  पेंशनस्वरूपात पैशांची तरतूद करणे म्हणजे स्वतःला आयुष्यभरासाठी आर्थिक स्वातंत्रात ठेवणे .
(रीटायरमेन्टला पैशासाठी मुलावर  किंवा इतर कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यक्यता नाही )

3.एकत्र कुटुंब पध्दती ( जॉईंट फॅमिली ) ची संस्कृती बदलून ,आता विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे . ( हम दो हमारे दो )

मुले कमवायला लागल्यावर आई वडीला पासून वेगळे राहणे अधिक पसंत करतात.

आई किंवा वडील दोघापैकी कोणीएकचा लवकर मृत्यू झाल्यास पेन्शन योजना दव्यारे दुसऱ्याला पैश्यासाठी मुलावर  किंवा इतर कोणावरही  अवलंबून राहण्याची आवश्यक्यता नाही. तुमच्या  जोडीदाराला  (पत्नी / पती ) ला पेंशन दव्यारे आयुभाराकरिता पैशाची तरतूद करता येते ._
 
4.पेन्शन योजनेत वारस हक्काने पेंशन रक्कम पत्नी किंवा मुलगा / मुलगी किंवा नातूंना सुद्धा घेण्याचा पर्याय आहे.
  
5.प्रॉपर्टी आणी इतर मालमत्ता ट्रान्सफर करून घेता येतात परंतु  पेन्शन योजना ट्रांसफर करून घेता नाही_

पेन्शन योजनेद्वारे एखादी व्यक्ती निवृत्तीचे जीवन स्वाभिमानाने तसेच आर्थिक स्वातंत्र्यात जगू शकतो._

6. रीटायरमेन्टला आवश्यक उच्च वैद्यकीय खर्च आणी लिविंग स्टॅंडर्ड कायम राखण्यासाठी पेंशन प्लॅन गरजेचा आहे.

आपल्याला पेन्शन असल्यामुळे फॅमिली आणी नातेवाईकांत समाजात आदर मिळतो .

Satpute consultancy services
your truly well-wisher....

8888344306
satpute.co.in

Tuesday, January 19, 2021

आर्थिक प्रगती साधायची असेल तर तूमच्या कड़े मेडिक्लेम इन्शुरन्स असायलाच हवा...

 

आर्थिक प्रगती साधायची असेल तर तूमच्या कड़े मेडिक्लेम इन्शुरन्स असायलाच हवा...


मित्रांनो तुम्ही मेहनतीने पैसे कमावता, त्यातून तुम्ही तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण करत असतात.
भविष्याबद्दल तुमचे खुप स्वप्न असतात


मुलांचे चांगले शिक्षण, विवाह, स्वतःच घर, विदेश यात्रा, आनंदी निवृत्त आयुष्य etc. त्यादृष्टिने तुमची वाटचाल सुरु असते पै-पै बचत चालु असते आणि जर अचानक एखाद्या जीवघेण्या आजाराणे तुमच्या घरात शिरकाव केला तर तो तुमची सर्व गणीत चुकवून टाकतो,
मग सुरुवात होते...


हॉस्पिटल, डॉक्टर, महागडी औषधं, वेगवेगळ्या तपासण्या (एम.आर.आय., सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे, पॅथॉलॉजिक तपासणी etc.), ऑपरेशन, कृत्रिम अवयव बसवण्याचा खर्च etc.
अशावेळेस जमवलेले सर्व पैसे खर्च होतात, मित्र नातेवाईक यांच्या कडून उसनवार पैसे घ्यावे लागतात यामध्ये चांगले वाईट अनुभवही येतात. सावकारी व्याजाचे पैसे घ्यावे लागतात.


घर, गाडी, प्रॉपर्टी, सोने तारण ठेवावे लागते किंवा ते विकण्यास आपण मजबूर असतो.
मग उरलेले आयुष्य कर्ज फेडण्यात जाते.


उमेदीच्या काळात पाहिलेल्या स्वप्नांशी तडजोड करावी लागते स्वप्न हे स्वप्नच राहून जातात.
बहुसंख्य लोकांच्या आयुष्यात वरील घटना घडल्या आहेत.


जर आपल्या एखादया मित्राला कर्जबाजारी का झालास
असे विचारले तर बहुसंख्य लोकांचे हमखास पुढीलप्रमाणे उत्तर असते
वडील आजारी होते, आई आजारी होती, मी आजारी होतो, पत्नी आजारी होती, मुले आजारी होते...आजारपणामुळे कर्ज झाले आहे.


यासाठी खबरदारी म्हणून आगोदरच तुमच्याकडे मेडिक्लेम इन्शुरन्स असायलाच हवा कारण मेडिक्लेम इन्शुरन्स तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमजोर होऊ देत नाही तुम्ही तुमच्या प्रियजनांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतात.


मेडिक्लेम इन्शुरन्स असल्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांचा उपचार चांगले डॉक्टर, आधुनिक व सुसज्ज हॉस्पिटल मध्ये करू शकतात.


मेडिक्लेम इन्शुरन्स मध्ये कोणते खर्च दिले जातात
कोणत्या हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावा लागेल
मेडिक्लेम इन्शुरन्स असल्यावर हॉस्पिटलचे बिल भरण्याची गरज आहे का किंवा आम्हाला कशाप्रकारे खर्च दिला जाईल
वयाची अट काय
कोणकोणते आजार कव्हर केले जातात
किती प्रीमियम भरावा लागेल
यासारख्या असंख्य प्रश्नांसाठी संपर्क करावा...

8888344306 | satpute.co.in | sbs@satpute.co.in

 

                  

          

 

टर्म इन्शुरन्स हा खऱ्या अर्थाने इन्शुरन्स हा अर्थ सार्थ करतो

 आज आपण विम्याचा एक प्रकार शिकणार आहोत : टर्म इन्शुरन्स (TERM INSURANCE) 

Disclaimer:

फक्त आर्थिक साक्षरता आणि धोक्यांपासून वाचवण्यासाठी ही माहिती........

इन्शुरन्स आपण ह्या साठीच घेतो की भविष्यातल्या संकटा बाबत चिंता न करता जगणे.

टर्म इन्शुरन्स हा खऱ्या अर्थाने इन्शुरन्स हा अर्थ सार्थ करतो.

टर्म इन्शुरन्स मध्ये ग्राहक प्रीमियम स्वरूपात रक्कम भरतो ज्या बदल्यात त्याला मोठ्या रकमेचे कव्हर( sum assured) भेटते. ह्या इन्शुरन्स ची खासियत ही आहे की ' मोठी sum assured' मिळते. म्हणजेच विमा धारकाचा मृत्यू झाल्यास मोठी रक्कम मिळते !

Sum assured किती आणि प्रीमियम किती हे तुमच्या वयानुसार ठरत असते ! जितके वय कमी, तितका प्रीमियम कमी ! उदाहरणार्थ, माझ्या एका नातेवाईकाने 10,000 वार्षिक प्रीमियम घेतले ज्याला १ कोटी रुपये कव्हर आहे आणि त्याचे वय 27 आहे.

Term insurance घेताना, annual premium चा विचार करण्यापेक्षा; रोजचा प्रीमियम मोजावे ! जसे, माझ्या नातेवाईकाने विचार केला असावा, वर्षाचे 10,000 म्हणजे रोजचे 27.

रोजचे 30 आपण कुठेही खर्च करतो,  त्यामध्ये आपल्याला १ कोटींचा coverage मिळतो व मनाला भविष्याची चिंता होत नाही.

तुम्ही विचार करू शकता, की जर तुम्हाला काही झाले तर तुमच्या परिवाराला ती रक्कम वाईट प्रसंगातून निघण्यास सहाय्य करेल! शिवाय, त्या पैशांमध्ये तुमच्या मागे तुमची पत्नी/आई/वडील हे त्यांचे खर्च, मुलांचे शिक्षण, लग्न, रिटायरमेंट चे पैसे बाजूला काढू शकता !

एक लक्षात घ्या, टर्म इन्शुरन्स मध्ये विमाधारकला काहीही न झाल्यास ; प्रीमियम परत मिळत नाही. रायडर नावाचा एक extra plan; टर्म प्लॅन सोबत विकला जातो, जो की आपल्यावर बंधनकारक नसतो. त्यात accident rider, critical illness rider आणि अजून बरेच प्रकार असतात.

वरती मी Accident चा उलेख केला. Accident मध्ये तेव्हाच पैसे मिळतात जेव्हा तुम्ही term insurance सोबत accident rider सुद्धा विकत घेता; ज्यामुळे प्रीमियम ही वाढतो. Accident rider म्हणजे accident मध्ये अपंगत्व आल्यास तुमचा जगण्याचा खर्च ह्या पैशांतून निघतो.

अशाच प्रकारे ciritical illness rider हा सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता; ज्यात विमा कंपनी ने दिलेल्या ' लिस्ट ' मधून आजार झाल्यास ,कंपनी ठराविक रक्कम देते. पण रायडर घेताना तुम्ही सर्व पडताळणी नीट केली पाहिजे. कारण critical illness मध्ये हॉस्पिटल बिल वर आधारित पैसे मिळत नाही.

Critical Illness चा "Non indemnity claim " असतो ; म्हणजे असं की: तुमचा खर्च कितीही असला तरी, Insurance company fixed amount देते. समजा २ जणांनी क्लेम केला. दोघांचा Sum Assured ५ लाखाचा होता पहिल्याच Hospital खर्च आला २ लाख आणि दुसऱ्याचा ८ लाख कंपनी, दोघांना ५ लाख देणार

Critical illness मुळे तुमचा प्रीमियम ही वाढतो. पण तुम्हाला तशी गरज असल्यासच घ्या. नाहीतर चांगला health insurance तुमची गरज भागवत असल्यास critical illness बद्दल विचार करा की खरंच आपल्याला तशी गरज पडेल का ?

ह्यात अजून एक ट्विस्ट असा आहे की काही कंपन्यांनी टर्म इन्शुरन्स चा प्रीमियम refundable स्वरूपात केला आहे पण ह्याचा प्रीमियम २-३ पट महाग असते.

आता कव्हर किती असावे? तुमच्या वार्षिक कमाई च्या १०/१५ पट असावे. जेवढे कव्हर वाढणार, तेवढा प्रीमियम वाढणार. किती वयापर्यंत घ्यावे ? जोपर्यंत तुमचा परिवार तुमच्या कमाई वर अवलंबून असेल तोपर्यंत. जसे की ६०/६५ वयापर्यंत घ्या. जास्त प्रीमियम भरू शकत असाल तर ७५/८० पर्यंत घ्या.

टर्म इन्शुरन्स कोणी घेऊ नये ?

१) ज्याला आधीपासूनच मोठे आजार आहेत , त्यांचे claim settle होण्यास अवघड असतात किंवा reject होतात.

 २)मद्यपान करणारी, अमली पदार्थ सेवन करणाऱ्या लोकांना देखील हा प्लॅन मिळणे अवघड असते.

३)जे आर्थिक स्वतंत्र आहेत किंवा ज्यांनी इतकी संपत्ती कमवली आहे की त्यांचा उद्या मृत्यू झाल्यास ती संपत्ती पूर्ण परिवाराच्या गरजा पूर्ण करू शकते ; अशांनी विचारपूर्वक घ्यावा.

जर तुम्ही वय लपवले किंवा रोगांची चुकीची माहिती दिली किंवा इतर काही चूक केली तर claim reject होऊ शकतात. म्हणून विमा घेतानाच नीट paper वरती प्रत्येक बिंदू वर अभ्यास करा. हप्ता पूर्ण भरणार असाल तरच विमा घ्या. नाहीतर अर्धवट भरल्यास पॉलिसी lapse होऊन नुकसान होते.

टर्म प्लॅन घेतांना सल्लागाराला खूप सारे प्रश्न विचारा. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी terms and conditions मध्ये आहेत का? ते पाहा. पोलिसी नंबर, फायदे, फ्रौड झाल्यास ' 'Ombudsman ' कडे तक्रार करणे, इ. गोष्टी एका कागदावर लिहून आपल्या परिवाराला तो कागद जपून ठवण्यास सांगा!

समझा की विमाधारकाचा मृत्यू झाला आणि इन्शुरन्स कंपनी ने फ्रौड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही insurance ombudsman कडे जाऊन तक्रार नोंदवू शकता !

https://policyholder.gov.in/report.aspx Ombudsman हा third party असतो; जो विमा धारकला न्याय देण्यास मदत करतो.

सगळ्यात महत्वाचे, पोलिसी documents पूर्ण वाचावे. आपल्याला पॉलिसी "मिळाल्यानंतर १५ दिवस फ्री लूक पिरियड " असतो ज्यात आपण सर्व पडताळणी करतो. जर सल्लागारांनी चुकीची माहिती दिली असे वाटत असेल, तर पॉलिसी कॅन्सल करा आणि त्याची एक प्रत तुमच्याकडे ही ठेवा

फक्त term insurance घेऊन बसू नये Term insurance + ULIP + Health insurance+ Emergency Fund+ Real Estate असा portfolio असावा....

अधिक माहितीसाठी संपर्क करावा...

https://bit.ly/2GknXAM

8888344306 | satpute.co.in | sbs@satpute.co.in