Sunday, April 19, 2020

ऑनलाईन अंत्यविधी

ऑनलाईन चे हे युग आहे, 
जन्म दाखला - ऑनलाईन
रेशन कार्ड - ऑनलाईन
बँक -ऑनलाईन
लग्न जुळणी -ऑनलाईन
इतकच काय तर क्राइम पण ऑनलाईन होऊ लागले आहे

पण काही दिवसापासून एक नवीन गोष्ट कानावर पडत आहे ती म्हणजे ऑनलाईन अंत्यविधी

कलयुगातील प्रगत आधुनिकीकरण याची एक भयानक भेट म्हणजे ऑनलाईन अंत्यविधी

गेल्या काही दिवसापासून अशी काही परिस्थीती निर्माण झाली आहे, आपण हतबल झालो आहे

आणि अशा परिस्थीतीत फेसबुक लाइव / झूम लाइव मध्ये करावे लागत आहे ऑनलाईन अंत्यविधी

ऑनलाईन जग हे किती आभासी आहे याची जाणीव या प्रसंगावरून होत आहे

ज्यांच्यावर इतके प्रेम केले, ज्यानी इतके प्रेम दिले त्याना  शेवटचा निरोप असा ऑनलाईन द्यावा लागत आहे 

हे भयानक आहे पण आता हेच कटू सत्य आहे

आपण बनवले हे ऑनलाईन जाळे यात आपणच आपण अडकलो आहे 

ऑनलाईन म्हणजे एकदमच वाईट नाही, पण त्याचा कसा , किती , कधी वापर करावा हे सर्वात महत्वाचे आहे

ऑनलाईन साठी संपूर्ण जगात जे सर्वात जास्त वापरले जाणारे हत्यार म्हणजे स्मार्ट फोन

स्मार्ट फोन खरच खूप स्मार्ट आहे, त्याने भगवंताच्या सर्वात सुंदर निर्मिती मानव..याला मूर्ख बनवून ठेवल आहे

धन्यवाद
दास सातपुते

Thursday, April 16, 2020

रामायण आणि आजची युवा पिढी

रामायण आणि आजची युवा पिढी

लोकडाऊन च्या काळात जबरदस्तीने लादलेले रामायण हे युवा पिढीला आपलेसे करेल काय ?

फेसबुक, टिक टोक , व्हॉट्सऍप, वेब सिरीस मध्ये व्यस्त असलेली ही युवा पिढीला, रामायण समजणे जरा अवघडच, पण कठीण नाही

रामायण  बघणे आणि समजणे यात फरक आहे, आणि ते जीवनात वापरणे फार लांबच

युवा पिढी कडून याची लगेच अपेक्षा करणे थोडे चुकिचे होईल, कारण या संस्कारा ची वेळ गेलेली आहे

कारण मातीचा गोळा हा आता कडक झाला आहे
मऊ मातीचा गोळा (बालपण) गेलेले आहे , महत्वाची वेळ गेलेली आहे ,

नाही माहित पण पालक कुठे व्यस्त होते, आणि आधुनिक शिक्षण पद्धती बदल तर काय बोलायचे.

दुचाकी चे आरसे काडून फेकून देणारी ही युवा पिढी, याना आरसा दाखवणे जरा कठीणच, पण असो

आजची युवा पिढी ही हुशार आहे, त्याचा  IQ  फार  स्ट्रॉंग आहे

माझी विनंती आहे , नका ऐकू कोणाचे , नका बसू प्रवचनाला पण तुम्ही स्वतः वाचन करा रामायण
तुम्हाला आरसा दिसेल तूमचे आयुष्य बदुलन टाकेल
वाचून तर बघा ,

काही नाही तर रामायण वाचतानाचे फोटो स्टेटसला लोड करा ,लाइक तर मिळणारच

काही वर्षा पूर्वी एक चित्रपट आला होता, दोन गाणी फार फेमस झाली होती...
झिंगाट….. आणि याडं लागलं गं…..
या दोन गाण्याचा एकत्र अभ्यास केला तर असा अर्थ येतो

आयुष्य झिंगाट असेल तर याडं तर लागनारच
अजून वेळ गेलेली नाही !

दास सातपुते

आमच्याकडून असे का घडले ?

परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज सांगतात ,
इतरांमध्ये दोष शोधण्याने आपलेच हृदय दूषित होते.

म्हणून दोष बघन्यापेक्षा सोलुशन वर बोलू

१. आमच्याकडून असे का घडले ?

मानवाने जे पेरले ते निसर्गाने उगवले,

पण ज्या बिया पेरल्या गेल्या त्या दूषित होत्या,

बिया म्हणजे संस्कार, तत्व , मूल्य, इत्यादी.

बिया दूषित आहे याची हवी तशी कल्पना मानवाला अजून झालेली नाही

तो बिचारा पेरत आहे, आणि निसर्ग उगवत आहे

२. याचे मुळ कारण काय?

परंपरागत ज्या बिया मानवाला मिळत आहे तो त्या पेरत आहे

बेसिक मध्ये गडबड झाली आहे त्यावर कोनाचे लक्ष्य नाही

बिया दूषित आहे !

आधुनिक शिक्षण पद्धती हे या बिया ट्रान्सफर करण्याचे काम करत आहे

EMI मध्ये अडकलेली ही संस्कृती याना इतका वेळ नाही आहे, की विचार करावा !

बिचारे आहे ते !

संस्कार असेच बिंबवले आहे यात त्याची काय चूक !

३. या परिस्थतीतून बाहेर पडल्यानंतर पुढे काय? 

असो जे झाले ते झाले...

आता पुढे काय ?

संकल्प...

ज्या बिया पुढे आपल्या मुलाना देणार त्या

बिया च्या दर्जा उत्तम करणार

बिया या, सत्य, न्याय, धर्म यावर अवलंबून
असणारच

म्हणजे मिळणारे पीक हे
"चारित्र्य संपन्न",  "विवेक संपन्न" आणि "स्वाभिमानी"* असेलच

- धन्यवाद,
दास सातपूते