Friday, September 13, 2024

आणखी २५ वर्षांनी मध्यमवर्गीय घराचा महिन्याचा घरखर्च किती असेल?


आणखी २५ वर्षांनी मध्यमवर्गीय घराचा महिन्याचा घरखर्च किती असेल?

महागाई मुळे आपला घरखर्च दर वर्षी वाढत असतो, परंतु आपला पगार देखील वाढत असल्यामुळे आपल्याला फारसा फरक दिसून येत नाही. ५ ते १० वर्ष नंतरचा काळाचा विचार केला तर चांगला फरक कळून येतो.  रिटायरमेंट प्लँनिंग चा विचार करताना महिन्याचा घरखर्च विचारात घेतला जातो. कारण रिटायरमेंट नंतर हा खर्च असणारच आहे, आणि महत्वाची बाब म्हणजे त्या वेळी उत्पन्न बंद झाले असेल, पण हा खर्च दर महिन्याला करावा लागेल. 

इथे घरखर्च म्हणजे, असा खर्च कि जो रिटायरमेंट देखील असणार आहे. ह्या खर्चा मध्ये मुलांच्या शाळेचा दरवर्षी असलेला खर्च आणि आपण भरत असलेल्या EMI चा विचार केलेला नाही, कारण रिटायरमेंट हे कोणतेच खर्च नसणार. 

एक तक्ता इथे दिला आहे जर आपला सध्याचा खर्च २५,००० असेल आणि महागाई ६% प्रमाणे असेल तर २५ वर्ष नंतर महिन्याचा खर्च १.०७ लाख असेल. हा टेबल बघून २५ वर्ष नंतर आपल्या घरखर्चाचा अंदाज येईल.     

खरं सांगतो! रिटायरमेंट च्या दृष्ठीने काही विचार केला नसेल तर नक्की करा, कारण आजचा २५,००० दर महिन्याचा खर्च अजून २५ वर्षानंतर १.०७ लाख झाला असेल आणि त्या वेळी आपले उत्पन्न बंद झाले असेल.

या संदर्भात माझी काही मदत हवी असेल तर मला नक्की संपर्क करू शकतात.

satpute.co.in I 8888344306

कंपाउंडिंगची खरी ताकद

कंपाउंडिंगची खरी ताकद

 मागच्या मंगळवारी मी एक पोल घेतला होता, १०% दराने १० वर्षांसाठी रु. १००० ची मासिक SIP केल्यास रु. २,०१,४५८ मिळतील. गुंतवणुकीतून मिळणारी अंतिम रक्कम वाढवण्यासाठी जर तुम्हाला फक्त एकच घटक दुप्पट करण्याचा पर्याय दिला, तर तुम्ही कोणता निवडाल?

१. परतावा दर दुप्पट करणार - २०%  

२. SIP रक्कम दुप्पट करणार - २००० रुपये प्रति महिना 

३. कालावधी दुप्पट करणार - २० वर्ष 

चला! या प्रत्येक पर्यायाची सविस्तर माहिती घेऊयात आणि कोणता घटक आपल्याला सर्वात जास्त फायदा देईल ते समजून घेऊयात:

१. परतावा दर दुप्पट करणे: २०%

१००० रुपये SIP १० वर्षांसाठी आणि दर १०% वरून २०% केला, तर कंपाउंडिंगची ताकद आपल्याला योग्य प्रमाणात फायदा मिळवून देईल आणि आपली रक्कम १,४२,८५३ ने वाढून ३,४४,३११ होईल. थोडक्यात आपली रक्कम १.७ पट होईल.  

२. SIP रक्कम दुप्पट करणे: २००० रुपये प्रतिमहिना

२००० रुपये SIP १० वर्षांसाठी आणि १०% दराने आपली रक्कम २,०१,४५८ ने वाढून ४,०२९१५ होईल. थोडक्यात आपली रक्कम दुप्पट होईल. 

३. गुंतवणुकीचा कालावधी दुप्पट करणे: २० वर्षे

१००० रुपये SIP १०% दराने २० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर आपली रक्कम ५,२२,५२९ ने वाढून ७,२३,९८७  होईल. थोडक्यात आपली रक्कम ३.६ पट झालेली असेल. 

कंपाउंडिंगमध्ये कालावधी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. जितकी दीर्घकाल गुंतवणूक टिकवली जाते, तितकी कंपाउंडिंगची सायकल जास्त वेळा चालते. SIP रक्कम आणि परतावा दर तेच राहिले तरी, कालावधी वाढवल्यास अंतिम रक्कम खूप जास्त होऊ शकते.

योग्य पर्याय कोणता?

प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे काही फायदे आहेत. परंतु जर आपण "कंपाउंडिंगची खरी ताकद" पाहिली, तर कालावधी हा सर्वात प्रभावी घटक ठरतो. अगदी कमी रक्कमेसुद्धा दीर्घकाल टिकवून ठेवल्यास मोठ्या संपत्तीत रूपांतरित होऊ शकते. परतावा दर (खरंतर आपल्या हातात नाही) किंवा SIP रक्कम वाढवणे हे चांगले उपाय आहेत, परंतु जर त्यात दीर्घकाळ सातत्य आणि संयम ठेवला, तर कंपाउंडिंगच्या प्रभावाने ती रक्कम अनपेक्षितरीत्या मोठी होऊ शकते.

MF गुंतवणूक संदर्भात माझी मदत, आणि SIP मधील गुंतवणुकीसाठी खालील लिंक वर करून आपले फ्री E-Wealth MF अकाउंट सुरु करू शकतात. (अर्थात मी तुमच्या मदतीसाठी नेहमी उपलब्ध असेल) 

खर्च व गुंतवणूक यातील फरक समजा

खर्च व गुंतवणूक यातील फरक समजा 

प्रश्न : मी रियल इस्टेट व्यवसायिक आहे. व्यवसाय वाढीसाठी चांगले इंटिरियर, एसी, गाडी यासाठी २० लाख रुपये खर्च करावा, असे काहीजण सुचवतात. हा खर्च योग्य आहे का? 

उत्तर : प्रथम तुम्ही खर्च व गुंतवणूक यांतील मूलभूत फरक लक्षात घ्या. खर्च म्हणजे ज्यातून तुम्हाला कोणताही परतावा येत नाही. उदा. मुलांची मोठी लग्ने, बेंजो, फेटे इत्यादी दिखाव्यावर पैसे उधळणे, हा झाला उधळपट्टीयुक्त खर्च. शिक्षण, आरोग्य, अन्न, घर यासाठी येणारा खर्च हा जीवनावश्यक खर्च होय. उद्योग वाढवण्यासाठी दुकान व कार्यालयाला चांगले फर्निचर करणे, चांगली गाडी घेणे, चांगला एसी, टी मशीन इत्यादी सुविधांवर खर्च करणे, चांगला कर्मचारी नेमणे याला खर्च नव्हे तर गुंतवणूक म्हणतात. व्यवसायाच्या जाहिरातीवर केलेला खर्च हा खर्च नसून गुंतवणूक होय. जसे आपण आंब्याच्या रोपट्याला खतपाणी, औषधे देतो व त्याची परिणीती पुढे चांगले आंबे लागण्यास होते. व्यावसायिकाने आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी इंग्लिश स्पीकिंग क्लास, कॉम्प्युटर क्लास, पर्सनालिटी डेव्हलपमेंट कोर्स इत्यादी खर्च ही सुध्दा गुंतवणूक होय. तुमचा व्यवसाय जर ५० लाखांपर्यंतचा असेल व मार्जिन ५० टक्के असेल तर जाहिरातींवर अंदाजे ३ ते ५ लाख रुपये, कार्यालय सुशोभीकरण १ ते ३ लाख रुपये, पर्सनालिटी डेव्हलपमेंटवर २० हजार ते १ लाख रुपये गुंतवणूक करावी. ही गुंतवणूक व्यवसायाचे स्वरूप, ठिकाण व वेळेनुसार कमीजास्त असू शकते. 

“Wise spending is part of wise investing” 

एका बड्या बँक अधिकाऱ्याच्या गृहप्रवेश कार्यक्रमाचे निमंत्रण आले. या शुभप्रसंगी त्यांना मी २५ हजार रुपये किंमतीची जयपुरी कोरीवकाम केलेली गणेश मूर्ती भेट दिली. त्यातून खूप चांगले संबध प्रस्थापित झाले. पुढे त्यांनी आमच्या काही कोटींच्या फाईल्स पास केल्या. चांगले संबध प्रस्थापित करण्यासाठी गेलेला पैसा खर्च नसून ती गुंतवणूक आहे. कर्ज काढून बिनकामाच्या गावाला जेवायला बोलावून काय उपयोग? तुमचीच बुंदी खाऊन तुमच्याच मांडावाला हात पुसून जातात व म्हणतात “ह्याच्यात काय दम आहे मोठं लग्न करण्याचं? कर्ज झालेवर जमीन विकेल हा..!”


वयाच्या ११ व्या वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये उतरून जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार बनलेले वॉरन बफे

वयाच्या ११ व्या वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये उतरून जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार बनलेले , वॉरन बफे

खेळण्याच्या वयात कोकच्या ६ बाटल्यांचा संच विकून ५ सेंट्सचा स्वकष्टाने नफा मिळवणाऱ्या वॉरन बफे यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर जगातील अनेक लोकांनी कमावली आहे. मग बफेंनी यात जगावेगळं असं केलं तरी काय?

कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच बफेंच्या यशाचं वेगळेपण आहे. 

‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणाऱ्या बफेंकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत. 

जगभरात गुंतवणूक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरन बफे यांचा आज जन्मदिवस (30 August 1930). जगातील कोट्यवधी लोक शेअर बाजारातून पैसे कमविण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करतात. गुंतवणुकीबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन आजही अतिशय प्रभावी ठरते. वॉरन बफे हे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी एक मोठे नाव आहे. त्यांच्या गुंतवणुकीचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होतो.  जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते आजही सातव्या स्थानावर आहेत. 

बफे यांना आपल्या युवा अवस्थेतच Business आणि Investing विषयी आवड निर्माण झाली आणि त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. कोलंबिया बिजनेस स्कूलमधून ते पदवीधर झाले जिथे ते बेंझामिन ग्रॅहम यांच्याकडून गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान आणि व्हॅल्यू इन्वेस्टिंगच्या कन्सेप्टविषयी बरेच काही शिकले. ओरॅकल ऑफ ओमाहा म्हणून ओळखले जाणारे वॉरन बफे आत्तापर्यंतच्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक समजले जातात. 

वॉरन बफे यांचे 5 गुंतवणूक मंत्र : 

1. गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा : 

शेअर्स विकत घेतल्यानंतर एका दिवसात किंवा फार कमी वेळात विकण्यापेक्षा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यामध्ये तुमची गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवणे चांगले. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक शेवटी जास्त परतावा देते, परंतु त्यासाठी तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

2. रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका : 

बाजारात लवकरात लवकर श्रीमंत होण्याची हाव तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. चांगला Portfolio तयार करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. यासाठी खूप संयम लागतो. बाजारातून चांगल्या परताव्यासाठी तुम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी ज्यांचे Business Model तसेच त्यांचे व्यवस्थापन चांगले आहे.

3. ध्येय ठेवून गुंतवणूक करा : 

ध्येयाशिवाय केलेली गुंतवणूक अनेकदा फायदेशीर नसते. तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा हुशारीने गुंतवा. त्या गुंतवणुकीत पैसा कसा वाढणार आहे हे समजत नसेल, तर त्यापासून दूर राहणेच बरे.

4. वैविध्य समजून घ्या : 

‘जवळची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नये’ हे सूत्र गुंतवणुकीलाही लागू केले पाहिजे. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी असलेली रक्कम वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वितरित करावी. संपूर्ण पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नका, सर्वांमध्ये समतोल ठेवा.

5. रास्त भावाने करा शेअर्सची खरेदी : 

एखादी कंपनी उत्तम दर्जाची उत्पादने बनवत आहे किंवा ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. वॉरन बफे असे सांगतात, एखाद्या मोठ्या कंपनीचे शेअर्स मोठ्या किंमतीला खरेदी करण्यापेक्षा चांगल्या कंपनीचे शेअर्स वाजवी किंमतीला विकत घेणे कधीही चांगले.

वॉरन बफे यांचा हा प्रसिद्ध विचार प्रत्येक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने कायम लक्षात ठेवला पाहिजे.

“खर्च केल्यानंतर जे वाचते, त्याची बचत करु नये, तर बचत केल्यानंतर जे राहते, त्यातून खर्च केला पाहिजे.” 


दंड भरायचा की फी भरायची ? सर्वाव्हल ऑफ द फिटेस्ट - पावर ऑफ कंपाऊंडिंग.

 दंड भरायचा की फी भरायची ? 

सर्वाव्हल ऑफ द फिटेस्ट. 

पावर ऑफ कंपाऊंडिंग.


लॉंग टर्म इन्वेस्टिंग अजिबात सोपी नाही. हे आपण जितके जास्त वर्ष लॉन्ग टर्म इन्वेस्टर म्हणून व्यतीत करतो तितके कळत जाते. काही चुका अशा असतात ज्यामध्ये Undo बटन नसते. त्या दुरुस्त करता येत नाहीत. पण भविष्यात पुन्हा त्या चुका रिपीट होऊ नये म्हणून काळजी घेता येते. मानव प्राणी हा भावनेवर चालणारा प्राणी आहे. त्यामुळे चुका रिपीट होत असतात.

इन्वेस्टिंग मध्ये जेव्हा आपण चूक करतो आणि त्या चुकीमुळे जर तोटा झाला असेल तर समजावे की आपण ट्युशन फी भरलेली आहे. या चुकीमुळे आपल्याला शिकायला मिळाले. चुकीतून शिकता येत असेल आणि तशी चूक परत रिपीट होत नसेल तर चुकीतून झालेल्या नुकसानीला ट्युशन फी असे समजा. 

पण एकदा चूक करूनही तीच चूक पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर होणारे नुकसान ट्युशन फी नसते तर तो दंड असतो. 

लॉन्ग टर्म इन्वेस्टिंग मध्ये ट्युशन फी भरली तर ती सुद्धा गुंतवणूक म्हणून काम करते आणि भविष्यात होऊ शकणाऱ्या चुका टाळून अधिक फायदा मिळवता येतो. दंड भरत राहिला तर एक दिवस मार्केट मधून बाहेर फेकले जाल. 

मार्केटमध्ये खूप नफा कमावण्यापेक्षासुद्धा खूप काळापर्यंत टिकून राहणे अधिक महत्त्वाचे असते. डार्विनचा सिद्धांत सुद्धा इथे तंतोतंत लागू पडतो. सर्वाव्हल ऑफ द फिटेस्ट. 

डार्विनने इथे शब्दांची चॉईस करताना खूप विचार केलेला आहे. तो सर्वाव्हल म्हणतो, winning म्हणत नाही. फिटेस्ट म्हणतो, स्ट्रॉंगेस्ट म्हणत नाही. सर्वाव्हल म्हणजे नेहमी जिंकलेच पाहिजे असेही नाही, फिटेस्ट म्हणजे नेहमी स्ट्रॉंगेस्टच असले पाहिजे असेही नाही. 

आपल्या चुकांमधून शिकणाऱ्या आणि त्या चुका पुन्हा रिपीट न करणाराच फिटेस्ट असतो.


वॉरन बफेट यांना जगातील सर्वश्रेष्ठ गुंतवणूकदार मानले जाते. त्यांचे श्रेष्ठत्व कशात आहे? त्यांना मिळणारे रिटर्न्स इतर सर्व इन्वेस्टर पेक्षा बेस्ट आहेत का? नीट बघितलं तर बफेट यांच्यापेक्षा सुद्धा अधिक दरसाल दर शेकडा दराने रिटर्न्स कमावणारे ग्रेट इन्वेस्टर होते आणि आहेत. तरीसुद्धा या सगळ्यांमध्ये बफेट हे जास्त श्रीमंत का? हे समजून घेण्यासाठी पावर ऑफ कंपाऊंडिंग, सर्वाव्हल ऑफ द फिटेस्ट, दंड की ट्युशन फी हे वर चर्चिले गेलेले मुद्दे यांचा अन्वयार्थ लावावा लागेल.

वारेन बफेट हे या तिन्ही मेंटल मॉडेल्सचे जिते जागते उदाहरण आहेत.

कंपाऊंडिंग मध्ये म्हणजेच चक्रवाढ दरामध्ये दोन महत्त्वाचे व्हेरिएबल असतात ते म्हणजे रेट ऑफ रिटर्न आणि टाईम. यापैकी रेट ऑफ रिटर्न आपल्या हातात नसेलही पण टाईम आपल्या हातात असतो. बफेट यांच्या केस मध्ये हा टाईम खूप मोठा आहे. किती मोठा तर 80 वर्षाहून अधिक. त्यांची गुंतवणूक वयाच्या अकराव्या वर्षी सुरु झाली. यात त्यांचा मोठेपणा नव्हता, त्यांचे आजोबा सुद्धा एक विद्वान गुंतवणूकदार होते. त्यांच्या घरात गुंतवणुकीचे वातावरण दोन-तीन पिढ्यांपासून सुरू होते. त्यामुळे ते privileged होते हे नक्की. (असो तो वेगळा विषय आहे.) बफेट यांचे दर साल दर शेकडा दराने 20-21% रिटर्न्स आहेत. पण त्यांचा टाईम व्हेरिएबल खूप मोठा आहे. 


या तुलनेत जिम सायमन यांचे रिटर्न 70% च्या आसपास आहेत. जिम सायमन खूप मोठे गणित तज्ञ होते. त्यांच्याविषयी लिहिलेले पुस्तक, The Man Who Solved the Market हे वाचण्याजोगे आहे. सायमन्स यांनी गणित, अल्गोरिदम यांचा वापर करून मार्केट मधून खूप मोठे रिटर्न्स कमावले. त्यांना आतापर्यंतचा ग्रेटेस्ट इन्वेस्टर मानले जाते.

नीट समजून घ्यायचे तर वारन बफेट यांना आपला पोर्टफोलिओ दुप्पट करण्यासाठी अंदाजे चार वर्षे लागतात. त्याच ठिकाणी जिम सायमन यांचा पोर्टफोलिओ दोन वर्षांच्या आत दुप्पट होत असे. तरीसुद्धा जिम सायमन्स हे बफेट यांच्यापेक्षा निम्म्याहून कमी श्रीमंत होते. ज्यांना पावर ऑफ कंपाऊंडिंग कळते त्यांना हे समजणे सोपे जाईल. 

जिम सायमन हे हे यावर्षी मे महिन्यात वारले. बफेट याच वर्षी 30 ऑगस्ट ला 94 वर्षांचे झाले. त्यांची हेल्थ आणि मानसिकता पाहून ते अजून एक- दोन दशक जगतील याची मला खात्री आहे. जिम सायमंस हे स्ट्रॉंगेस्ट होते, पण फिटेस्ट नक्कीच नव्हते. बिलिनिअर लोकांकडे सगळ्या जगापेक्षा श्रेष्ठ हेल्थकेअर, न्यूट्रिशन विकत घेण्याची क्षमता असते. सध्या जिवंत असलेले कितीतरी बिलियनर लोक 125 वर्षांपेक्षा अधिक जगू शकतील अशी सुद्धा एक थेरी आहे. त्याविषयी नंतर कधीतरी लिहू. याउलट इतके श्रीमंत असूनही जिम सायमन यांचा मृत्यू 85 वर्षांचे असताना झाला. कारण त्यांनी न्यूट्रिशन, हेल्थकेअर च्या सगळ्या नियमांना झुगारून दिले होते. ते सतत स्मोकिंग करत असत. त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनास्तेमुळे त्यांना शक्य असूनही जास्त जगता आले नाही. या उलट वॉरन बफेट हे कसे जगावे याचे जिवंत उदाहरण आहे. माझ्या दृष्टीने बफेट फिटेस्ट आहेत, स्ट्रॉंगेस्ट नसतीलही.


सर्वाव्हल ऑफ द फिटेस्ट. पावर ऑफ कंपाऊंडिंग. या फक्त परीक्षा पास करण्यापुरत्या संकल्पना नाहीत.

🌟 आयटी कोचिंग व्यवसायाचा प्रवास 🌟

 🌟 आयटी कोचिंग व्यवसायाचा प्रवास 🌟

साधारण दोन महिन्यापूर्वी एक जवळच्या संपर्कातून आयटी कोचिंग चा व्यवसाय करणाऱ्या एका क्लायंटसोबत काम चालू केले. त्यांची कंपनी आयटी क्षेत्रातील विद्यार्थी आणि व्यावसायिकांना ऑनलाइन क्लास च्या माध्यमातून प्रशिक्षण देत असते. त्यांना व्यवसाय पुढच्या पातळीवर नेण्यासाठी एक व्यापक कोर्स प्लॅटफॉर्म विकसित करायचा होता. त्यांचे एक स्पष्ट उद्दिष्ट होते: एक वापरायला सोपा प्लॅटफॉर्म तयार करणे ज्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन कोर्स चा ऍक्सेस देता येईल आणि व्यवसाय भरपूर वाढवता येईल.

आमची योजना: आमच्या पहिल्या मीटिंग मध्ये एक एक पायरी पुढे जायचे ठरवले

१. वेबसाईट: खरंतर वेबसाईट चा उपयोग लीड मिळवण्यासाठी होत नाही, पण ऑनलाइन प्रेझेन्स साठी आणि पेमेंट गेटवे साठी वेबसाईट असणे गरजेचे असते.

२. पेमेंट गेटवे इंटिग्रेशन: ऑनलाइन व्यवसायात पुढे जाण्यासाठी पेमेंट गेटवे असणे अत्यंत गरजेचे आहे. या द्वारे सर्व आर्थिक व्यवहार सहजतेने पूर्ण होतो आणि ग्राहकांना एक चांगला अनुभव मिळतो. पेमेंट गेटवे चे अँप्रोवल मिळवणे थोडेसे कठीण आहे. आधी माझे स्वतःचे ३ वेळेस पेमेंट गेटवे नाकारले गेले, पण इथे आम्हाला दोन ते तीन दिवसात मिळाले.

३. कोर्स प्लॅटफॉर्म (मेंबरशिप): हा सर्वात महत्वाचा भाग आहे, माझ्या क्लायंट ने एक चांगले काम केलेले होते, ज्या वेळी त्यांचा ऑनलाईन क्लास असायचा, ते सर्व क्लास रेकॉर्ड करून ठेवायचे. अशा पद्धतीने त्यांनी जवळ जवळ एक संपूर्ण कोर्स रेकॉर्ड केलेला होता (३० लेक्चर चा एक कोर्स आहे). हे सर्व कन्टेन्ट मिळाल्यावर माझ्याकडे असलेल्या मेंबरशिप प्लॅटफॉर्म चा उपयोग करून मी त्यांचा कोर्स तयार केला. आणि त्यांचे पहिले ऑनलाईन प्रॉडक्ट तयार झाले.

४. कोर्स लँडिंग पेज: कोर्स तयार केला पण विकायचा कसा? यासाठी लँडिंग पेज चा उपयोग केला जातो. या लँडिंग पेज वर कोर्स बद्दल संपूर्ण माहिती देऊन तिथेच कोर्स विकत घेण्यासाठी एक बटन दिलेले असते. या बटन वर क्लिक करून विद्यार्थी चेकआऊट पेज वर जातो, तिथे योग्य ते पेमेन्ट करून त्याला कोर्स चा ऍक्सेस दिला जातो. हि सर्व प्रोसेस ऑटो मोड मध्ये होणे गरजेचे आहे.

५. मार्केटिंग धोरण: पुढचा महत्वाचा प्रश्न, त्यांच्या कोर्स ची फी जवळ जवळ १५ ते २५ हजार आहे. आता या किंमतीत कोणता नवीन विद्यार्थी कोर्स विकत घेणार? यासाठी गरज असते लीड जेनेशनची. लीड जेनेशन साठी दोन योजनांचा वापर करायचा ठरवले.

पहिली योजना 'डेमो कोर्स" : या मध्ये ३० लेक्चर पैकी ६ लेक्चर चा फ्री ऍक्सेस दिला, आणि त्यासाठी सोशल मीडिया पेड मार्केटिंग चालू केले.

दुसरी योजना 'वेबिनार सेशन": ११ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट ला आम्ही फ्री वेबिनार ठेवले, या साठी देखील लँडिंग पेज बनवले, आणि सोशल मीडिया पेड मार्केटिंग चालू केले.

६. ईमेल ऑटोमेशन: विद्यार्थ्यांना सतत गुंतवून ठेवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी, आम्ही एक ईमेल ऑटोमेशन सेटअप केली. या मधून जे काही लीड येत होते त्यांना नियमित पणे मेल पाठवत होतो.

७. सोशल मीडिया मार्केटिंग: लीड्स निर्माण करण्यासाठी, आम्ही सोशल मीडिया पेड मार्केटिंग चालू केले. डेमो कोर्स मार्केटिंग मधून आम्हाला साधारण ५०+ लीड मिळाल्या आणि वेबिनार सेशन साठी ५०+ लीड मिळाल्या.

परिणाम: क्लायंट चा सेल करण्यामध्ये हातखंडा आहे. निर्माण झालेल्या ११०+ लीड्समधून, त्यांनी कुशलतेने ७ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आणि फक्त सुरुवातीच्या टप्प्यातच ₹१.७ लाख पर्यंत उत्पन्न मिळवले.

आपण जर कोणत्याही कोचिंग (काही शिकवत असाल) व्यवसायात असेल तर आपण ऑनलाईन कोर्स बद्दल विचार करायला पाहिजे.