आणखी २५ वर्षांनी मध्यमवर्गीय घराचा महिन्याचा घरखर्च किती असेल?
महागाई मुळे आपला घरखर्च दर वर्षी वाढत असतो, परंतु आपला पगार देखील वाढत असल्यामुळे आपल्याला फारसा फरक दिसून येत नाही. ५ ते १० वर्ष नंतरचा काळाचा विचार केला तर चांगला फरक कळून येतो. रिटायरमेंट प्लँनिंग चा विचार करताना महिन्याचा घरखर्च विचारात घेतला जातो. कारण रिटायरमेंट नंतर हा खर्च असणारच आहे, आणि महत्वाची बाब म्हणजे त्या वेळी उत्पन्न बंद झाले असेल, पण हा खर्च दर महिन्याला करावा लागेल.
इथे घरखर्च म्हणजे, असा खर्च कि जो रिटायरमेंट देखील असणार आहे. ह्या खर्चा मध्ये मुलांच्या शाळेचा दरवर्षी असलेला खर्च आणि आपण भरत असलेल्या EMI चा विचार केलेला नाही, कारण रिटायरमेंट हे कोणतेच खर्च नसणार.
एक तक्ता इथे दिला आहे जर आपला सध्याचा खर्च २५,००० असेल आणि महागाई ६% प्रमाणे असेल तर २५ वर्ष नंतर महिन्याचा खर्च १.०७ लाख असेल. हा टेबल बघून २५ वर्ष नंतर आपल्या घरखर्चाचा अंदाज येईल.
खरं सांगतो! रिटायरमेंट च्या दृष्ठीने काही विचार केला नसेल तर नक्की करा, कारण आजचा २५,००० दर महिन्याचा खर्च अजून २५ वर्षानंतर १.०७ लाख झाला असेल आणि त्या वेळी आपले उत्पन्न बंद झाले असेल.
या संदर्भात माझी काही मदत हवी असेल तर मला नक्की संपर्क करू शकतात.
satpute.co.in I 8888344306

No comments:
Post a Comment